This version of the page http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/59163710.cms (0.0.0.0) stored by archive.org.ua. It represents a snapshot of the page as of 2017-07-08. The original page over time could change.
my betterhalf - missing you in Marathi, Maharashtra Times
  • MT
  • इतर
  • गानसरस्वतीला वंदन
  • मटा कार्निव्हल
  • लाइक अँड शेअर
  • मटा विशेष
  • हेल्पलाइन
  • मटा मोबाईल
  • मागील अंक
  • Live TV
  • घरचा शेफ
  • माझी जागा
  • घेई छंद
  • माझा पहिला पगार
  • चलती का नाम
  • तिसरा डोळा
  • एका ट्रिपची गोष्ट
  • कट्टा गँग
  • माझा खजिना
  • गाणं मनातलं
  • असं वाढवलं मुलांना
  • नसतेस घरी तू जेव्हा
  • सांगा ना गोष्ट
  • बिनधास्त बोल
  • क्षण कसोटीचे
  • थँक यू

नसतेस घरी तू जेव्हा

माझ्या प्रियेची साथ मोलाची

संजय वाईरकर, सांताक्रूझ

आमच्या लग्नाला २५ वर्षं पूर्ण झाली. क्षणभर विश्वासच बसत नाही, पण ते जुने फोटो पाहताना जुन्या रम्य आठवणींना उजळा देताना खूपच छान वाटतं. त्यात दोन्ही घरातून प्रेम विवाह करणारे आम्ही पहिलेच, याचाही आम्हाला अभिमान वाटतो. कित्येक बिकट प्रसंगातून आम्ही दोघांनी धडाडीने मार्गक्रमण करत, आमचं सुंदर घरकुल बांधलं. स्नेहाची सोबत होती आणि आहे म्हणून मी आजपर्यंतची वाटचाल न डगमगता करू शकलो. स्नेहाने कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार माझ्याकडे केली नाही. आमच्या लहान घरात एकत्र कुटुंबात तिने सगळ्यांना सावरून घेतलं, सगळ्यांचे मान-पान, आवडनिवड, येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांची उठ-बस ती जणू अशी करत होती की मला तिचा खूप अभिमान वाटत असे. माझ्यासाठी, माझ्या घरासाठी ती कधी जास्त दिवस माहेरी गेली नाही. ती कर्तव्य आणि स्त्रीधर्म पालन कसोटीत पूर्ण उतरली. आमच्या संसारात खूप चढ-उतार आले तरीसुद्धा तिने माझी साथ कधी सोडली नाही. समजून-उमजून ती इतकं छान वागत आली की तक्रारीला कोणाला वावच मिळाला नाही. काम आणि घर दोन्ही सांभाळताना आमच्या दोन्ही मुलींवर तिचं तितकंच बारीक लक्ष होतं. त्यांची आवडनिवड सांभाळताना त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची ती सतत काळजी घ्यायची. तिने आमच्या संसाराचा डोलारा खूप छान सांभाळून मलादेखील माझ्या व्यवसायात तितकीच मोलाची साथ दिली. म्हणून माझ्यासाठी स्नेहा आदर्श गृहिणी आहे. तिने दिलेल्या आधारामुळे मी स्थिरावलो. त्यासाठी मी तिचा सदैव ऋणी आहे व राहीन. या २५ वर्षांच्या कालखंडात माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा काळत-नकळत तिला मी दुखावलं असेल तर यासाठी मी तिची मनापासून माफी मागतो. अशा माझ्या यशस्वी, सुखी संसाराची गुरु किल्ली असणाऱ्या माझ्या धर्मपत्नीला माझा मानाचा मुजरा!
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
Web Title: my betterhalf

(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)

तुमची प्रतिक्रिया
धन्यवाद

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड

तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल

नियम व अटी

प्रतिक्रिया
अधिक »

नसतेस घरी तू जेव्हा सुपरहिट

  • ​ ती गृहलक्ष्मीच!
  • ​ ती माझं वैभव!