This version of the page http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/47116267.cms (0.0.0.0) stored by archive.org.ua. It represents a snapshot of the page as of 2017-01-16. The original page over time could change.
mukund vasanti dikshit - Maharashtra Times
  • MT
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • कोल्हापूर
  • अहमदनगर
  • नाशिक
  • जळगाव
  • नागपूर

महाराष्ट्र

  • आपण इथे आहात - 
  • होम » 
  • महाराष्ट्र » 
  • mukund vasanti dikshit

समाजसेवेचे ब्रीद

Share on Facebook

समाजसेवेचे ब्रीद



मुकुंद आणि वासंती दीक्षित

बीएच्या परीक्षेत चारवेळा नापास झालेला मुलगा म्हणजे आयुष्याच्या परीक्षेतही नापासच! मुकुंद दीक्षितांना नापासांच्या यादीत समाजाने लोटून दिलं. पण जगणे हे त्यापलीकडचे आहे, याचा शोध घेणाऱ्या मुकुंदने वेगळे काही करण्याच्या उर्मीने समाजकार्यात भरीव काम करणाऱ्या काहीजणांना पत्र लिहिली, त्यात त्यांनी म्हटले होते, 'मला समाजाला जोडायचं आहे,' बाबा आमटेंकडून पत्राला उत्तर आले, 'निघून ये, आनंदवन वाट पाहतंय..' स्वतःसह समूहाच्या आयुष्याला दिशा देऊ इच्छिणाऱ्या मुकुंदरावांची जिद्द, बांधिलकी जाणली ती वासंती यांनी. या दोघाचं लग्नही बाबा आमटेंनी लावून दिले. बारा महारोग्यांच्या जोडप्यांमध्ये हे तेरावे जोडपे.. या सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याची वासंतीची किती तयारी आहे, हे तपासून पाहण्यासाठी दीक्षितांनी त्यांची कठोर परीक्षाही घेतली... महारोग्यांसोबत काम करताना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे खोट सांगितले, तरीही बाई दीक्षितांसोबत लग्न करण्याच्या, आनंदवनात काम करण्याच्या निश्चयापासून तसूभरही ढळल्या नाहीत...

कोणत्याही मुलभूत सोयीसुविधा नाही, आजूबाजूला आप्तस्वकीयांचा गोतावळा नाही, साधी भाषाही ओळखीची नाही. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडलेली. राहत्या घरातून कधीही साप विंचू निघायचे. जंगलात एकदा दीक्षितांना नाग चावला, तेव्हाही बाईंनीच हे विष शोषून त्यांना मृत्यूच्या तावडीतून सोडवले. लग्नापूर्वी चौकटीतील सर्वसामान्य आयुष्य जगलेल्या वासंतीताई आदिवासींच्या जगण्याशी सहज एकरूप झाल्या. आरोग्यसेवेच्या माध्यमातून लोकसेवा हे समाजसेवेचे ब्रीद मानून या पतीपत्नीने कामाची हेमलकसा येथे १९७६ साली अनौपचारिक शिक्षणाच्या कार्याने सुरुवात केली. ही शाळा बाबांना चालवायची होती, मात्र हे स्वप्न त्यांनी या जोडप्याच्या हाती दिले.. जेव्हा सरकारी अनुदान घेण्याचे ठरले तेव्हा वैचारिक मतभेदांमुळे मुकुंद दीक्षितांनी ते काम थांबवले, तिथून एकवीस किलोमीटरवर असलेल्या लाहिरी या गावांमध्ये दोन झोपड्यांमधून यांनी स्वतंत्रपणे कामाची सुरुवात केली. एका झोपडीत हे दोघे राहत तर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी दवाखाना सुरू केला. डॉ. प्रकाश आमटेकडून मिळालेले जुजबी वैद्यकीय ज्ञान गाठीशी होते, त्यातून काम सुरू झाले. जखमांचे ड्रेसिंग करण्यापासून टाके घालण्यापर्यंत, छोट्या शस्त्रक्रियांपासून या भागातील गरजू अडलेल्या महिलांच्या प्रसूतीपर्यंतची सक्षम आरोग्यसेवा या दोघांनी उभी केली. हे काम करत असताना या दोघांनाही इथल्या सामान्य शोषित आदिवासींचे प्रश्न समजत गेले, त्यातून 'जंगल बचाव, मानव बचाव', 'आमच्या गावी, आम्ही सरकार'सारख्या कामाची सुरुवात झाली. लोकांचे संघटन करत असतानाच ८५- ८६च्या सुमारास येथे नक्षलवादी चळवळ रुजू लागली होती. या जोडप्यानेही सोबत यावे यासाठी नक्षलवाद्यांकडून दबाव येऊ लागला. मात्र, अहिंसक व शांततापूर्ण मार्गाने विकास करण्यावर विश्वास असलेल्या दीक्षितांनी ही मागणी धुडकावून लावली. त्यामुळे चिथावलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. १९९२मध्ये दीक्षितांनी पुन्हा नाशिक गाठवे, मध्यप्रदेशातील झाबुआ येथे बाबा आमटेंचे काम नुकतेच सुरू झाले होते. तेथील दरोडेखोरांमध्ये परिवर्तन आणण्यासह नर्मदा बचाओ आंदोलनामध्येही त्यांनी दहा वर्ष सातत्याने काम केले. तरीही मनात अस्वस्थता होती. गावांच्या विकासासाठी पूरक काम करण्याच्या प्रेरणेने २००१मध्ये त्र्यंबकेश्वर येथील खरोली गावामध्ये दीक्षित पतीपत्नीने काम सुरू केले. लोकसहभागातून काम उभे करायचे होते. पण, लोक त्यासाठी तयार नव्हते. गावात बस नव्हती, की रस्ता नव्हता. शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न होता. प्रत्येकाची लढाई आपापल्या बेटावर स्वतंत्रपणे सुरू होती. या सगळ्यांना एका सूत्राने बांधायचे असेल, तर लोकसहभागातून नेतृत्त्व उभे राहायला हवे. ही वैचारिक बैठक पक्की होती. गावात गटातटाचे राजकारण करणार नाही, दारू पिणार नाही, लोकसहभाग महत्त्वाचा, समूहविकास महत्त्वाचा हे ब्रीद समोर ठेवून या दोघांनी गावाकडूही श्रमदानाच्या माध्यमातून खरोलीमध्ये नंदनवन फुलवले. आजूबाजूच्या सामुंडी, धाडोशी, झारवड, अस्वली या त्र्यंबकेश्वरपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या गावांमध्येही आता समूहप्रेरणेने विकासाची सुरुवात होत आहे. त्यांचा मुलगा प्राजंल टाटा सामाजिक संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दीक्षितांनी साठी तर वासंतीताईंनी पन्नाशी पार केली आहे, तरीही समाजसेवेचे तेच ब्रीद घेऊन हे तिघेही उज्जल महाराष्ट्राचे स्वप्न गावागावामध्ये पेरणार आहेत.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
Web Title: mukund vasanti dikshit

(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ

  • आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात
  • दिल्लीत बळजबरी मुलींना किस केले, व्हिडिओ व्हायरल
  • पुणे: चाकणमधील एका फ्लॅटमध्ये ७० कोब्रा नाग सापडले
  • बेस्ट बसने अचानक घेतला पेट; कारही जळाली
धन्यवाद

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

खाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप 'माझ्या मते' असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटी

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड

तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल

तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.
आपली प्रतिक्रिया शोधण्यासाठी आपल्या कि-बोर्डवर एकाचवेळी ctrl आणि F दाबा आणि आपले नाव टाइप करा.
प्रतिक्रिया

व्हिडिओ

  • कॅलेंडरवर PM मोदींचा फोटो छापण्याची परवानगी घेतली नाहीः PMO
  • हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
  • हैदराबादः ४० किलो सोने चोरणाऱ्या चौघांना अटक
  • RSS ने संघटनेत महिलांचा अधिक समावेश करावाः अडवाणी
  • शारदा घोटाळा प्रकरणी CBI कडून कुणाल घोष यांची चौकशी
  • वसुंधरा राजे आणि श्री श्री रविशंकर यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
  • इलिनॉइसला हिमवादळाचा जबर तडाखा
  • प्रिन्स चार्ल्स यांचे हवामान बदलावर पुस्तक
  • श्रीनगरचे डाल सरोवर थिजले
  • हिमाचल प्रदेशातील हिमवृष्टीने पर्यटकांमध्ये आनंद

महाराष्ट्र बातम्या

  • मा. गो. वैद्यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या!- सेना
  • सेननं स्वीकारलं मनसेचं आव्हान; चुरस रंगणार
  • ‘सैनिकांची कॅन्टिनही आता होणार कॅशलेस’
  • ‘सूर्यकिरण’चे अचानक दर्शन
  • अॅमेझॉनचा तीन लाखांचा माल जप्त

महाराष्ट्र बातम्या

  • जय जय राष्ट्र महान!
  • शिकवीन मराठीचा धडा
  • उमटतायंत शिणुमाच्या पाऊलखुणा!
  • सावध ऐका कामगार कायद्यांच्या हाका
  • ऑनलाइन मराठीची बोलु कौतुके