This version of the page http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20436307.cms (0.0.0.0) stored by archive.org.ua. It represents a snapshot of the page as of 2017-01-16. The original page over time could change.
- Maharashtra Times
  • MT

  • आपण इथे आहात - 
  • होम » 

पर्यावरण रक्षणासाठी...

Share on Facebook

पर्यावरण रक्षणासाठी...

आजची तरुणाई ऐषारामात आणि आपल्याच विश्वात रमणारी आहे, अशी टीका वारंवार होत असते. पण, तिलाही पर्यावरणाचे भान आहे. आजच्या पर्यावरण दिनी या तरुणाईच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया...
........

फटाक्यांवर काट
आपल्याकडे पर्यावरणाबाबत जो बेफिकीरपणा दाखवला जातो, तो अस्वस्थ करणारा आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी, घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवा, असे आवाहन महापालिका नेहमी करत असते. आम्ही आमच्या घरातला कचरा वेगळा ठेवतो आणि तो कचरेवाल्याला तशाच प्रकारे देतो. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गेल्या पाच- सहा वर्षांपासून मी फटाके उडवणे सोडून दिले आहे. पतंगाच्या धारदार मांजामुळे पक्ष्यांना होणारी इजा लक्षात घेऊन आम्ही साधाच मांजा वापरतो.
- तन्मय टिकले, टीवायबीकॉम, एमपी वालिया कॉलेज ऑफ कॉमर्स, बोरीवली.


ऊर्जाबचतीला प्राधान्य
गरज नसेल तेव्हा घरातली विजेची उपकरणे मी आठवणीने बंद करते. त्यामुळे विजेचा गैरवापर टाळता येतो. फक्त घरात नाही तर ट्रेन, कॉलेज आणि इतरांच्या घरी असतानाही मी ही दक्षता घेते. मी घरात स्वतःच एक बाग तयार केली आहे. त्यात दुर्मिळ वनस्पती आहेत. त्याद्वारे त्यांचं जतन करण्याचा माझा प्रयत्न असतो. याशिवाय पाण्याचा गैरवापर मी कटाक्षाने टाळते. विनाकारण गाड्या, बिल्डींगचे आवार धुण्याच्या कामाला मी विरोध करते. कॉलेजमध्येही पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल हे मी बघते. आमच्या दुकानात प्लास्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कापडी पिशव्या वापरायचं आवाहन मी नेहमी करते. स्वतः देखील या नियमांचं आवर्जून पालन करते.
- अनघा वाणी, पोदार कॉलेज

खारीचा वाटा
पर्यावरण संवर्धनासाठी मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतो. रस्त्यावर कचरा टाकणं मला अजिबात आवडत नाही. एखाद्याने रस्त्यात किंवा ट्रेन, बस, गाडीच्या खिडकीतून कचरा टाकला तर मी स्वतः जाऊन त्या वर्तनाबद्दल त्यांना समजावून सांगतो, त्यातली चूक दाखवून देतो. बरेचदा लोक कबूल करून ती सुधारतात. काहीजण मात्र भांडण करतात. अशा वेळी मी स्वतः तो कचरा उचलतो. यात मला कमीपणा वाटत नाही. प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पाण्याचा गरजेपुरता वापर, एसीचा कमी वापर होईल याची मी काळजी घेतो. ध्वनीप्रदूषण होऊ नये म्हणून सोसायटीत आणि आजूबाजूच्या परिसरात लाऊड स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा मी आणि माझे मित्र प्रयत्न करतो.
- माधव साळुंके, रचना संसद

सवयी बदलायला हव्यात
एक विद्यार्थी म्हणून पर्यावरणाबद्दल जाण बाळगायलाच हवी. पर्यावरणासंबंधी कॉलेजच्या सर्व अॅक्टिव्हीटीजमध्ये मी आवर्जून भाग घेते. एखाद्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणं किंवा त्याबाबत ऑनलाईन याचिका दाखल करणे, अशा उपक्रमांत मी सहभागी होते. तसंच या सगळ्या गोष्टींच्या प्रचारासाठी मी ब्लॉग्जचीही मदत घेते. घरात आणि कॉलेजमध्ये विजेची बचत करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे अशा गोष्टींचे मी पालन करते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे.
- चित्रा आडकर, टीवायबीए, वझे-केळकर कॉलेज, मुलुंड

जबाबदारी सर्वांचीच
पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच असून प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यायला सुरूवात केली तर मोठा बदल घडू शकतो. कचरा विशेषतः प्लास्टिक पिशव्या, रॅपर इतरत्र फेकणे बंद करायला हवे. बाइक वापरणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्या योग्य तपासणीअभावी होणारे वायू प्रदूषण मोठे आहे. ते आटोक्यात आणले पाहिजे. गरज असेल तेव्हाच मी खासगी वाहनांचा वापर करतो. तसेच दरवर्षी एक तरी झाड लावतो.
- राहुल मोरे, गुरू नानक कॉलेज, जीटीबीनगर

ही तर सामाजिक जबाबदारी
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला एक जाणीव असायला हवी. एक सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वांनीच सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. मी वैयक्तिक पातळीवर शक्य त्या गोष्टी पर्यावरणासाठी करतेच. कॉलेज फेस्टिवल्समध्ये होणारी जनजागृती नृत्ये, नाट्य तसेच पथनाट्यात माझा हमखास सहभाग असतो. पर्यावरणाविषयीचे संदेश लोकांपर्यंत पोचवायला मला आवडतं. दुसरे सुरुवात करतील मग आपण बघू असा विचार मी करत नाही. एखादा उपक्रम हाती घ्यायचा झाला तर मी स्वतःहून पुढाकार घेते. संधी मिळाल्यास माझ्या नृत्यातून निसर्गाविषयीचा अविषकार करायला मला आवडेल.
- अपूर्वा दाणी ( सेंट झेवियर्स कॉलेज )

प्रत्यक्ष कृती महत्त्वाची
माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये वेळोवेळी पर्यावरणाविषयी माहिती सांगत असते. अभ्यासक्रमात असलेला हा विषय वाचून सोडून देण्यापेक्षा समजून घेऊन त्याप्रमाणे वर्तन करणे आवश्यक आहे. झाडे लावण्यावर माझा भर आहे. आम्ही एकदा पर्यावरण दिनादिवशी वृक्षारोपण केले होते. शिवाय वाढदिवसाच्या दिवशी पार्टी करण्यापेक्षा झाडं लावायला मला अधिक आवडतं. त्या झाडांची विशेष काळजी मी घेते. कागदाचा कमीत कमी वापर करायचा माझा प्रयत्न असतो.
- वैष्णवी केदारी ( स्वामी विवेकानंद पोलिटेक्निक कॉलेज)

माझा प्रयोग
पर्यावरण दिनाची नारेबाजी करण्यापेक्षा मी छोटे छोटे प्रयत्न करते. सुरवात मी केली ती कचऱ्यापासून. आमच्या घरी ओला आणि सुका कचरा असे दोन विभाग करून मी एक छोटा प्रयोग राबवते. सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, काच, कागद हे रिसायकल करण्यासाठी देते. ओल्या कचऱ्यातील भाजीपाला आणि शिल्लक अन्न वगैरे एका कुंडीत साठवून त्यात गांडूळ सोडलेत. हे कम्पोस्ट खत हे झाडांकरिता वापरते. चॉकलेट आणि बिस्कीटचे रॅपर्स शक्यतो बॅगेत किंवा कचरा कुंडीत टाकते. कॉलजमध्ये पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेते.
- मधुरा दिवेकर,
डहाणूकर कोलेज
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
Web Title:

(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ

  • आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात
  • दिल्लीत बळजबरी मुलींना किस केले, व्हिडिओ व्हायरल
  • पुणे: चाकणमधील एका फ्लॅटमध्ये ७० कोब्रा नाग सापडले
  • बेस्ट बसने अचानक घेतला पेट; कारही जळाली
धन्यवाद

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

खाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप 'माझ्या मते' असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटी

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड

तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल

तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.
आपली प्रतिक्रिया शोधण्यासाठी आपल्या कि-बोर्डवर एकाचवेळी ctrl आणि F दाबा आणि आपले नाव टाइप करा.
प्रतिक्रिया

व्हिडिओ

  • बेस्ट बसने अचानक घेतला पेट; कारही जळाली
  • रेपीस्टला दिल्ली पोलिसांनी केली अटक
  • जम्मू-काश्मीरः सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक
  • पश्चिम बंगालः गंगासागर येथे चेंगराचेंगरीत सहा ठार
  • आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात
  • नोएडा: पौष मेळ्याचे आणि पुस्तक प्रदर्शन
  • कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी; लोकांमध्ये नाराजी
  • माइन नाटकाद्वारे विनयभंगाच्या प्रकाराचा निषेध
  • १४६ वर्षांनी 'द ग्रेट शो ऑन अर्थ'वर पडदा
  • अॅमेझॉनवर महात्मा गांधींच्या प्रतिमा असलेल्या चपलांची विक्री