This version of the page http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/23709791.cms (0.0.0.0) stored by archive.org.ua. It represents a snapshot of the page as of 2017-01-15. The original page over time could change.
radha takone - Maharashtra Times
  • MT

  • आपण इथे आहात - 
  • होम » 
  • radha takone

मी ही दुर्गा – राधा ही जलपरी

Share on Facebook

मी ही दुर्गा – राधा ही जलपरी

ध्वनितरंगांनी जन्मतःच फारकत घेतली. संवादाचे माध्यमच खुंटले. पण आयुष्यात जलतरंग आले आणि आयुष्याला जगण्याचे एक ध्येय मिळाले. राधा टाकोणेने आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर जलतरंगांवर स्वार होत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली. वयाच्या बाराव्या वर्षी मेलबोर्न, ऑस्टेलिया येथील जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात लहान जलतरणपटू होण्याचा मान तिने पटकावला.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून सुरू झालेला हा जलतरणाचा प्रवास राधासाठी तसा अवघडच होता. एरवी काही सामान्य मुले खेळातच काय पण अभ्यासातही प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी धडपडत असतात. पण राधाला तर आवाजाचे जगच माहिती नव्हते. तिचे वडील संजय अशोक लेलॅण्डमध्ये कार्यरत. राधा दोन वर्षांची असतानाच कर्णबधिर असल्याचे निदान झाले तेव्हा आई संगीता, वडील संजय हे दोघेही हादरले होते. पण संगीता यांनी स्वतःला सावरले आणि राधाला घेऊन मुंबई गाठले. स्पीच थेरपीचे विशेष प्रशिक्षण घेऊन मायलेकी नागपुरात परतल्या. सोमलवार रामदासपेठमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असतानाच अॅक्वा स्पोर्टस् क्लबमधून तिने जलतरणाचा सराव केला. असंख्य स्थानिक, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील जलतरणाच्या स्पर्धा तिने जिंकल्या. सलग चारवेळा डेफ नॅशनल स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला जलतरणपटूचा बहुमान पटकावणाऱ्या राधाच्या नावे अनेक राष्ट्रीय विक्रम आहेत.

जलतरणाचा सराव सुरू असतानाच अभ्यासातही तिने विशेष चमक दाखवली. बारावीनंतर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंगच्या (व्हीआनआयटी) अंतिम वर्षाला मेकॅनिकेल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. चौथ्या वर्षाला असलेल्या राधाने गेल्या ऑगस्ट महिन्यात बुल्गेरिया येथे झालेल्या डिफलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

अपंगत्वावर मात करीत 'बेस्ट स्पोटर्समन'चा तीनदा किताब पटकावणाऱ्या राधाला नुकताच हर्ड फाउंडेशनचा पुरस्कारही मिळाला आहे. राधाची जलतरणातील ही 'डाइव्ह' साऱ्यांसाठी प्रेरणादायी अशी ठरली आहे. (शब्दांकन - मंजुषा जोशी)
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
Web Title: radha takone

(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ

  • करणने सोनमला केलं किस
  • पाकिस्तानने वझिरिस्तानमधून शेकडो पश्तून मुलींचे अपहरण करून त्यांना लाहोरमध्ये देहविक्रयासाठी गुलाम ब...
  • दिल्लीत बळजबरी मुलींना किस केले, व्हिडिओ व्हायरल
  • पुणे: चाकणमधील एका फ्लॅटमध्ये ७० कोब्रा नाग सापडले
धन्यवाद

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

खाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप 'माझ्या मते' असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटी

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड

तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल

तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.
आपली प्रतिक्रिया शोधण्यासाठी आपल्या कि-बोर्डवर एकाचवेळी ctrl आणि F दाबा आणि आपले नाव टाइप करा.
प्रतिक्रिया

व्हिडिओ

  • सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जवानांना तंबी
  • मनालीमध्ये जोरदार हिमवृष्टी, पर्यटकांची धमाल
  • बिहारमध्ये नाव उलटलेल्या अपघाताचा थरारक व्हिडिओ
  • नवजोतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये
  • जलिकट्टूवर सुप्रीम कोर्टाची बंदी असूनही कार्यक्रमाचे आयोजन
  • प्रेमीला पतीने गोळी घालून ठारले, महिलेची आत्महत्या
  • अलाहाबादमध्ये डॉक्टर्स आणि शल्यचिकित्सकांची निदर्शनं
  • मुक्तसरमध्ये अवैध दारू जप्त
  • 'सपा'चे चिन्ह विकणारे दुकानदार अडचणीत
  • १४ व्या मॅरेथॉनमध्ये मुंबई धावली