This version of the page http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/51732943.cms (0.0.0.0) stored by archive.org.ua. It represents a snapshot of the page as of 2016-10-03. The original page over time could change.
shobhayatra for Gudhipadwa celebration in nashik - Maharashtra Times
  • MT
  • इतर
  • पर्यटन
  • लाइक अँड शेअर
  • मटा विशेष
  • हेल्पलाइन
  • मटा मोबाईल
  • मागील अंक
  • Live TV
  • मटा ई पेपर
  • निवडणूक अमेरिकेची
  • नवरात्र
  • Photocontest

मटा विशेष

End Your Nightly Snoring Nightmare With This Simple Solution

Ad: My Snoring Solution

  • आपण इथे आहात - 
  • होम » 
  • इतर » 
  • मटा विशेष » 
  • shobhayatra for Gudhipadwa celebration in nashik

ढोल ताशांच्या गजरात निघणार शोभायात्रा

Share on Facebook

ढोल ताशांच्या गजरात निघणार शोभायात्रा

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात विविध कार्यक्रम

म. टा प्रतिनिधी, नाशिक

वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच हिंदू संस्कृतीनुसार नवीन वर्षाचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. या नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक शहरातील विविध भागातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. नववर्ष स्वागत यात्रा समिती व संस्कृती संवर्धन न्यासच्यावतीने गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी नाशिक शहरातील चार ठिकाणाहून ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा पाडव्याच्या दिवशी सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल, यात ढोल, ताशे, लेझिम, घोडे, पारंपरिक वेशभूषा केलेले नागरिक मोठ्या संख्येन सहभागी होणार आहेत.


पंचवटीत तीन यात्रा

पंचवटी परिसरातील नागचौक, भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिर, रविवार पेठेतील सुंदर नारायण मंदिर, या तीन ठिकाणाहून आणि द्वारका येथून हिंदू नववर्ष यात्रांची सुरुवात होणार आहे. या यात्रेचा समारोप जुना भाजी बाजार, गोदाघाट, नारोशंकर मंदिरासमोर होणार आहे. समारोपाप्रसंगी श्रीराम शक्तिपीठाचे १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील.

इंदिरानगरला चित्ररथ

इंदिरानगरच्या वेगवेगळ्या भागातून स्वागत यात्रा निघणार आहेत. यंदा स्वागत यात्रांबरोबरच जल्लोष नववर्षाचा खाद्यसंस्कृतीचा हा दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ११ ठिकाणांहून विविध पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश देणारे फलक घेवून, उंट, घोडे यांच्यासह ढोल ताशांच्या गजरात या स्वागतयात्रा निघणार आहेत. यंदा स्वागत यात्रेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. पेठेनगर येथे सकाळी साडेआठ वाजता गुढीचे पूजन करण्यात येणार आहे. स्वागत यात्रांचा समारोप पेठेनगर येथील राधारमण लॉन्स येथे होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे खाद्य व संस्कृतीचे माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी याठिकाणी प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचा गौरव करून त्यांना अकरा हजार रुपये व गौरवचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वागत यात्रेत सहभागी होण्याबरोबरच दोन दिवसांच्या खाद्य संस्कृतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

देवळालीत प्रथमच

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी देवळालीत सामाजिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रथमच दर्शन घडविण्यात येणार आहे. या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

स्वागत समितीतर्फे यात्रा

नववर्ष स्वागत यात्रा समितीच्यावतीने शुक्रवारी शहराच्या विविध भागातून स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. गंगापूर रोड, महात्मानगर, तिडके कॉलनी, शरणपूर रोड, काळेनगर अशा विविध भागातून ही यात्रा निघणार आहे. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेली लहान मुले, महिलांची बाइक रॅली, सायकल रॅली, तालरूद्र ढोल पथकाचे वादन असे विविध कार्यक्रम यात समाविष्ट असणार आहेत. शहरातील महात्मानगर, निर्मलनगर, नरसिंहनगर, श्रीराम मंदिर, पंडित कॉलनी, कॉलेज रोड, तिडके कॉलनी, संभाजी चौक या ठिकाणाहून यात्रा प्रारंभ होणार आहे. सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बीवायके कॉलेज चौक, कॉलेजरोड येथे ही यात्रा एकत्र येऊन यशवंत पाठक यांच्या उद्बोधनाने समारोप होईल. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

ब्रम्हध्वज मिरवणूक

गुढीपाडव्यानिमित्त नाशिकरोडला विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे सकाळी सातला देवळाली गावातील शिवाजी महाराज समाज मंदिरापासून ब्रम्हध्वज यात्रा सुरू होईल, अशी माहिती संयोजक अक्षय एडके यांनी दिली.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
Web Title: shobhayatra for gudhipadwa celebration in nashik

(Marathi News from Maharashtra Times , TIL Network)

तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ

  • पाहा:क्वांटिको-२ मध्ये प्रियांका चोप्राचा हॉट अवतार.
  • पाहा: भारतीय जवानांनी सर्जिकल कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळ जल्लोष केला.
  • योगी आदित्यनाथचा सलमान खानला पाठिंबा
  • भारतीय सैन्याने 'सर्जिकल स्ट्राइक' बलुचमध्येही करावा; बलुच नेत्यांची मागणी

FROM WEB

Leaked DNC Documents Expose Sarah Palin's Dirty Secrets!

Radar Online

That's How You Find Super Cheap Flights!

Save70

15 Foods For Healthy Hair

4 All Minds and Bodies

FROM MAHARASHTRATIMES

आम्ही ‘स्वच्छताग्रही’

लक्ष्य अव्वल स्थानाचे

राज ठाकरेंनी सलमानवर डागली तोफ

From the Web

More from MT

Barack’s Worst Nightmare! Malia Obama Caught PARTYING In..

Radar Online

The Ultimate Way to Get Cheap Hotel Rooms

Hotel Bargains

Then & Now: Stars Who've Aged Horribly

PressRoomVIP

Lessons From Fintech-The Future Of Insurance

Financial Times | Milliman

The Device That Puts an End to Snoring

My Snoring Solution

वायकर यांचा जमीन बळकावण्याचा प्रयत्न

ब्रा घालण्याबाबत काय म्हणते प्रियांका चोप्रा!

अंमली पदार्थांचा ‘दांडिया’मार्ग?

PoKमध्ये भारताचे हवाई हल्ले, घुसखोरी उधळली

सिंधु पाणी वाटप करार : एक राजनैतिक अस्त्र!

धन्यवाद

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

खाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप 'माझ्या मते' असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटी

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड

तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल

तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.
आपली प्रतिक्रिया शोधण्यासाठी आपल्या कि-बोर्डवर एकाचवेळी ctrl आणि F दाबा आणि आपले नाव टाइप करा.
प्रतिक्रिया

व्हिडिओ

  • भारताने पॅरिस करार स्वीकारला
  • शिमला: सफरचंद महोत्सवाला पर्यटकांचा प्रतिसाद
  • भारताला दुसऱ्या देशाचा घास घ्यायचा नाही: मोदी
  • तेलंगणा: महिला आणि ५ मुले पुरात वाहून गेली
  • राजकोट: महात्मा गांधी यांना विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली
  • पंजाबजवळील सीमा भागात उर्दू भाषेत आक्षेपार्ह संदेश असलेले फुगे आढळले
  • पाक कलाकारांच्या मुद्यावर सलमानला गायक अभिजितने सुनावले
  • साबरमती: कैद्यांनी अनोख्या पद्धतीने गांधी जयंती साजरा केली
  • नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी
  • योगी आदित्यनाथचा सलमान खानला पाठिंबा

From Around The Web

How To Make Your Old, Slow Computer Like-New Again (it's e..

Xtra-PC

Bikini Bombshell Hilary Duff Gets Playful On The Beach Wit..

Radar Online

Hillary PANICKED Over Monica Lewinsky Tell-All

Radar Online

From Maharashtra Times

झाडावर कार धडकल्याने तरुण ठार

MAHARASHTRATIMES

​धो धो पाऊस तरीही भिस्त टँकरवरच!

MAHARASHTRATIMES

पाकचा खोटेपणा उघड

MAHARASHTRATIMES