This version of the page http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18872572.cms (0.0.0.0) stored by archive.org.ua. It represents a snapshot of the page as of 2016-06-05. The original page over time could change.
- Maharashtra Times
  • MT

आपण इथे आहात - होम » 

घडताना, घडवताना....

Share on Facebook

घडताना, घडवताना....

- ऋतुजा सावंत

विदर्भ, मराठवड्यात सुरू असलेल्या दीपशिखा प्रेरिका प्रकल्पातील मुली वेगळ्या वाटेवरच्या. स्वतः घडल्यानंतर इतर मुलींनाही घडवू पाहणाऱ्या...

स्त्री सक्षमीकरणाचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. महिला संघटनांपासून सरकार पातळीवर नवनव्या उपाययोजना राबवण्यात सुरुवात झाली. हे खूप मोठ्या प्रमाणात व्हायला हवं, याची जाणीव होऊ लागली. खरंतर या आधीही सक्षमीकरणाचे लहान- मोठे प्रयोग सुरूच होते. यातून अनेक महिला घडल्या, आपल्यापुरता, आपल्या भोवतालच्या समाजापुरता सक्षम झाल्या. केवळ शहरात नव्हे, तर गावखेड्यातही.

शहरातली मुलगी आज खूप वेगाने बदलली, पोशाखापासून विचारांपर्यंत, थोडक्यात मॉडर्न झाली. पण काळानुसार गावाकडच्या मुलीही बदलल्या. पोशाखाने नसतील कदाचित पण विचाराने नक्कीच. केवळ स्वतःचा उत्कर्ष नाही, तर इतर मुलींना घेऊन पुढे जाण्याची वृत्ती गावांमध्ये अधिक दिसून येते. म्हणूनच याच एकजुटीच्या बळावर या मुली बालविवाह, दारुबंदी यांसारख्या सामाजिक प्रश्नांविरोधात धैर्याने उभ्या राहतात. युनिसेफतर्फे किशोरवयीन मुलींसाठी सुरू असलेल्या प्रकल्पातही अनेक प्रेरिकांचा प्रवास थक्क करून जातो. वर्धा, चंद्रपूर, जालना, लातूर, औरंगाबाद, नंदूरबार येथील प्रेरिकांनी शिक्षणापासून गावाची सुधारणा होईपर्यंत विविध प्रकारचे यशस्वी लढे दिले. त्यातून त्या स्वतः घडल्या आणि अनेकींना घडवलंही.

वीणा शिंदे ( नाव बदलले आहे) लातूरमधली. १३व्या वर्षी लग्न झालं. तेव्हा सहावीत होती. लग्नानंतर दोन वर्ष माहेरी असल्याने पुढे शिकली. तेव्हाही मंगळसूत्र, जोडवी लपवून ती शाळेत जायची. नंतर सासूने सासरी येण्याचा आग्रह धरला. शिक्षणाला ब्रेक मिळाला. पण वीणाने शिक्षकांना पत्र लिहून घरच्यांना समजवण्याची विनंती केली. अखेर शाळेत जाता परीक्षा देण्याची परवानगी सासूने दिली. दहावीच्या परीक्षेत ती तालुक्यात पहिली आली. नवं बळ मिळालं. नंतर तिने बचत गट सुरू करण्यात पुढाकार घेतला. बचत गटाचं काम वाढत गेलं आणि तिने २५० बचतगटांची स्थापना केली. आता ती प्रेरिका म्हणून काम करते. सैन्यदलात जाण्याचं माझं स्वप्न होतं. ते मी दुसऱ्या अर्थाने पूर्ण करत आहे. याचं अधिक समाधान आहे, असं वीणा सांगते.

लातूरच्याच सुचिता माने ( नाव बदलले आहे) हिने दारुबंदीसाठी संघर्ष केला. इतर महिलांना एकत्र करत ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव संमत करून घेतला. दरम्यानच्या काळात विरोधकांकडून धमक्या आल्या. पण ती बधली नाही. आज त्या गावात नऊ महिने दारुबंदी आहे. शिवनंदा बादुरहे हिनेही गैरप्रकाराविरोधात आवाज उठवला. ' दीपशिखा' चं प्रशिक्षण घेतल्यानंतर गावसुधारणेचा ध्यास तिने घेतला. गावातील पुरुष मंडळी जुगारात पैसा घालवतात. ते रोखलं पाहिजे हे तिच्या लक्षात आलं. तिने जुगार अड्डे बंद करण्याचा निश्चय केला. या लढ्यात तिने पुरुषांनाही विश्वासात घेतलं. अन्यथा हा प्रकार बंद झालाच नसता, असे ती सांगते.

रेश्मा कदमची ( नाव बदलले आहे) कथा जरा वेगळी. घरची परिस्थिती बेताची. लहानपणी वडिलांचं निधन झालं. रेश्माचं लग्न चांगल्या घरात झालं. नवरा सैन्यात. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं. काही दिवसांनी तिला मुलगी झाली. नवरा नाराज झाला आणि त्याने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तिला मारझोड करू लागला. शेवटी सगळं सोडून ती माहेरी गेली. पदरात दोन मुलं. भावाच्या बायकोचंही निधन झाल्याने त्याची दोन मुलं हिच्याकडेच. रेश्मा सुरुवातीला खचून गेली. पण नंतर तिने यातून उभं राहायचं ठरवलं. दीपशिखाच्या माध्यमातून तिला दिशा सापडली आणि तिने किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देण्याचा चंग बांधला. सुरुवातीला बरेच अडथळे आले. प्रशिक्षणाच्या ठिकाणी गावकरी खडे मारू लागले. पण रेश्मा थांबली नाही. अखेर गावकऱ्यांनाही याचं महत्त्व पटलं. आता रेश्मा नव्याने जगते आहे. मुलींना शिकवताना स्वतःचे दुःख विसरते आहे.

या प्रत्येकीचा लढा वेगळा, पण ध्येय एकच सुधारणेचं. या सुधारणा त्यांच्या गावापुरत्या मर्यादित असतील कदाचित, पण या अशा सुधारणांमधूनच मोठा बदल घडत असतो. त्यांचं हे घडणं आणि घडवणं, महिला सक्षमीकरणासाठी खरंच प्रेरणादायी ठरेल.
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा
तुमची प्रतिक्रिया

सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ

  • रणदीप-काजलच्या किसवर, काजलचे स्पष्टीकरण
  • सचिन आणि लता मंगेशकर यांचा तो मॉर्फ केलेला तन्मयचा व्हिडीओ
  • पाच हजार लोकांसमोर सलमानने कसा घातला लंगोट?
  • अक्षयने जॉनला 'सांड' म्हटल्यानंतर त्याने काय केले पाहा!
धन्यवाद

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया

खाली चार पर्याय दिलेले आहे. मराठीत टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला इनस्क्रिप्ट येत असेल तर पहिला ऑप्शन निवडा. अन्यथा दुसरा ऑप्शन निवडा, ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच majhya mate असे लिहिल्यावर आपोआप 'माझ्या मते' असे दिसू लागेल. तसंच इथं असलेला वर्चुअल किबोर्ड वापरूनही मराठीत लिहू शकता. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर तिसरा पर्याय उपलब्ध आहे.नियम व अटी

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड

तुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल

तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करतील त्यांना ब्लॉक करण्यात येईल.
आपली प्रतिक्रिया शोधण्यासाठी आपल्या कि-बोर्डवर एकाचवेळी ctrl आणि F दाबा आणि आपले नाव टाइप करा.
प्रतिक्रिया

व्हिडिओ

  • माकडाने सोनाराकडून चोरले पैसे
  • राजदच्या आमदाराने आयपीएस अधिकाऱ्याला केली शिवीगाळ
  • काळ्या पैशाचा वापर लोकहितासाठी करावा: भाजप आमदार
  • बिहार बोर्डाने 12वी विज्ञान शाखेच्या अव्वल विद्यार्थ्याचा निकाल नाकारला
  • भारतीय हवाईदलाचे ड्रोन गुरगावमध्ये कोसळले
  • हरयाणामध्ये पुन्हा जाट आंदोलन भडकण्याची शक्यता
  • जवानांची हत्या करणारे दहशतवादी कॅमेऱ्यात कैद
  • एनआयए अधिकाऱ्यांना पाकमध्ये परवानगी नाकारणे हा विश्वासघात: राजनाथ
  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील भीषण अपघातात १७ ठार
  • मथुरा हिंसाचाराचा मास्टरमाइंड ठारः यूपी पोलीस

बातम्या

  • कर्तृत्वाची विभागणी झाली?
  • अमेरिकेतील रेस्टॉरंट कामगारांची लढवय्यी
  • घडताना, घडवताना....
  • पॉवरबाज पाटलीणबाई
  • समृद्ध करणारा प्रवास